Tuesday 19 July 2016

Cannon Ball Tree, कैलासपती, नागलिंग





काही दिवसापूर्वी whatsapp वर एक फोटो आला होता. औदुंबराचे दुर्मिळ फुलं खास आपल्या ग्रुपवर बगैरे आणि एक सुंदर फुलं होतं, पुढे देवाला वहातात वगैरे माहिती ही होती. ते फुलं होतं कैलासपती चं, औदुंबराचा काही संबंध नसतांना whatsapp वरच्या मेसेजवर हे फुल चुकीचं नाव घेत फिरत होतं. आमच्या office समोर , डोंबिवलीत आणि मागे महाराष्ट्र निसर्ग उद्यानात गेलो असतांना तिथे हे फुल मी पाहिलं होतं. हे फुलच नाही तर ते झाडं बघण्यासारखं असतं. हे झाडं अगदी दुर्मिळ वगैरे नाही पण सहज जाता येता दिसण्यातलं ही नाही

इंटरनेट वर अधिक माहिती शोधतांना समजलं की हे झाड मुळात परदेशातलं आहे.दक्षिण अमेरिकेतून भारतात वसलेलं हे झाडं आहे. पण सध्या कैलासपती / नागलिंग वगैरे नावाने अस्सल भारतीय वाटायला लागलं आहे. काही ठिकाणी ह्या फुलाचं नाव नागचाफा असं सुद्धा लिहिलेलं आढळत पण नागचाफा हे संपूर्ण वेगळं झाड असत कैलासपती ची फुलं केरळा मध्ये म्हणे आवर्जून देवाला वाहतात. चागलं हाताच्या ताळव्याहून मोठ्ठं असं हे फुल असतं. अगदी आमच्या office समोर असल्याने त्याच्या बऱ्याच लीला बघायला मिळतात. वर्षातून दोन दा वगैरे ह्याला पानझडी येते पण बहरतो ही लगेच. ७०-८० फुट उंच वाढणारा हे वृक्ष त्याला ठराविक अंतराने फुटलेल्या फांद्या असतात. मूळ खोडाला पारंब्या सारख्या लोंबणाऱ्या उपशाखा असतात त्या एखाद्या भाविकाच्या नजरेला शंकराच्या जटा सारख्या दिसतात. ह्या झाडाची फळ अतिशय मोठी असतात. अगदी नारळाच्या आकारा पासून मोठ्या कलिंगड च्या आकाराची ही फळ झाडाला लटकत असतात म्हणूनच ह्याला कॅनन बॉल झाड असं नाव मिळालं आहे. ही फळ पिकल्यावर त्यांचा वास फारच उग्र असतो म्हणून ती पिकण्यापूर्वी काही पक्षी प्राणी त्याला खातात पण पिकल्यावर खात नाहीत. ह्या फळांचा वैद्यकीय उपयोग सुद्धा होतो
Rare tree

हातात जेमतेम मावतील इतकी मोठी झाडाची फुलं खूपच आकर्षक रंगाची असतात आणि त्यामुळे कीटकांना आकर्षित करतात. पांढऱ्या
आणि गुलाबी रंगानी नटलेल्या ह्या फुलांना चांगला सुगंध सुद्धा असतो. ह्यावर मेणाचा थर असावा कारण ही फुलं एकदम चकचकीत आणि त्यामुळे शो ची वाटतात . झाड लावल्यानंतर साधारण १२-१५ वर्षांनी ह्याला फुलं धरायला लागतात. फुलाचा मधला भाग शंकराच्या पिंडी सारखा भासतो तर त्या पिंडीभवती वळलेल्या पाकळ्या असतात म्हणूनच ह्याला कदाचित कैलासपती किंवा नागलिंगम अशी नावं मिळाली असावी. थोडक्यात हे झाडं खूपच आकर्षक आणि इतर झाडांपेक्षा वेगळं वाटतं. मागे एकदा भर उन्हाळ्यात महाराष्ट निसर्ग उद्यानात ह्या झाडाचे भरपूर फोटो काढता आले. पण तेव्हा झाडाची फळं फार मोठी झालेली नव्हती








No comments:

Post a Comment