Friday 6 May 2016

Jatropha podagrica, Buddha's Belly


Gout Plant, Gout Stick, Buddha Belly, Guatemala Rhubarb, Tartogo



महाराष्ट्र निसर्ग उद्यान, सायन इथे काही आठवड्यापूर्वी भटकायला गेलो होतो. भर उन्हाळ्यात ही हिरवं गार जंगल बघायला मिळालं आणि ते ही मिठी नदीच्या किनारी आहे. इथे खूप वेगवेगळी झाडं वृक्ष आणि अर्थात पक्षी फूलपाखर बघायला मिळाली.

ह्या झाडाने मात्र लगेच लक्ष वेधलं. भर उन्हात पान झडून गेलेली पण मस्त फुलं फुललेली आणि त्यात बियांचं फळ ही. ह्याझाडाचं नाव आहे Buddha Belly. सहजासहजी न दिसणारं असलं तरी दुर्मिळ वगैरे नाही. आणि वर्षभर फुलणारं हे झाड अनेक प्रकारच्या फुलपाखर किडे ह्यांना आकर्षित करतं आणि ह्याची माहिती कोळ्याला बरोबर असते म्हणूनच फोटोत बघाल तर कोळ्याने बरोबर फुलांभवाती जाळ विणून शिकारीची वाट बघत दडून बसलाय


हे झाडं कडक उन्हात, कमी पाण्यातसुद्धा मस्त राहतं असं समजलं. ह्याला मोठ्ठी पान असतात आणि फळाच्या आत बिया असतात आणि ते पूर्ण पिकलं की फुटतं आणि मग बिया लांब फेकल्या जातात. (तेरड्याच्या बियां सारखं)


ह्या झाडाचे काही औषधी फायदे सुद्धा आहेत पण ह्याच्या बिया मात्र विषारी असतात 
एकंदरीत उन्हाळ्याच्या रखरखाटात गुलमोहोर जसा डोळ्याला आनंद देऊन जातो तसं ह्या रोपट्यावरची फुलं प्रसन्न दिसतात

No comments:

Post a Comment