Tuesday 29 December 2015

Chromolaena odorata - तीव्र गंधा


















वसई किल्ला फिरतांना बालेकिल्ल्याच्या भिंतीवर हे झाड दिसलं. किल्याच्या भिंतीवर उगवलेल्या ह्या झाडा ने लगेच लक्ष वेधलं कारण एकतर त्याच्या पांढऱ्या पुंजक्याच्या आकाराची फुलं एकदम मस्त दिसत होती आणि दुसरं म्हणजे फुलपाखर त्यावर बागडत होती. 

ह्याच इंग्रजी नाव - Chromolaena odorata असं आहे आणि आपल्या देशात ह्याला अनेक नावं आहेत. जसं तीव्र गंधा – कारण ह्याची पान कुस्करली तर अतिशय तीव्र दर्प येतो, तसचं दुसरं नाव आहे , बाग धोका – कारण हे तण एकदा का बागेत पसरले की निघणं कठीण असतं आणि मग इतर झाडांना ते वाढायला अडथळा करत. 

सुर्यफुल कुटुंबातील हे झाड पण मुळचे उत्तर अमेरिकेचे रहिवासी पण ते नंतर आशियात आणले गेले असं म्हणतात आता इंडोनेशिया थायलंड वगैरे देशात कोवळ्या पानांचा रस जखमेवर उपचार म्हणून वापरतात. अर्थात हे इथले मूळ झाड नसल्याने इथल्या पशु साठी ही योग्य नाही आणि आपल्या कडील आयुर्वेदिक औषधात सुद्धा ह्याचा उल्लेख नाही

https://www.facebook.com/apalanisargmitra/



No comments:

Post a Comment